शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंनी चिथावणीखोर वक्तव्य करू नये -चंद्रकांत खंडाईत : देशाच्या सर्वोच्च सभागृहात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:02 IST

सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवाकोरेगाव भीमा प्रकरणात तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा.

सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. त्यावेळी गप्प बसलेले साताºयाचे लोकप्रतिनिधी बाहेर मात्र चिथावणीखोर वक्तव्ये करतात. खासदार उदयनराजे भोसले यांनी संसदेत भूमिका मांडावी,’ अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खंडाईत यांनी म्हटले आहे की, खासदार उदयनराजे भोसले यांनी खरे तर वढू या गावी जाऊन छत्रपती संभाजीराजे यांचा अखेरचा इतिहास समजून घ्यावा. त्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या शूरवीरांनाही समजून घ्यावे. नंतर ही दंगल कोणत्या विचाराने घडवण्यात आली याचा विचार करूनच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची महती लोकांना सांगावी. ज्या विचारसरणीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचेही विद्रूपीकरण केले. त्यांचे समर्थन आपण केले. २१ व्या शतकात वंचितांना न्याय मिळावा म्हणून निर्माण केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टलाही विरोध केला. त्यामुळे आपणही मनुस्मृतीच्या व्यवस्थेला बळी पडलेला आहात. यावरूनच कोणाची लायकी काय आहे, हे जनतेला समजून येईल.

खंडाईत यांनी पुढे म्हटले आहे की, साताºयाचे लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांनी मी जातपात मानत नाही, असे गुळगुळीत शब्द वापरून नंतर ३५ टक्के बाहेर पडले तर काय? आणि बाकीचे किती टक्के आहेत, असे चिथावणीखोर वक्तव्ये केली. याचा भारिप बहुजन महासंघ व समविचारी पक्षांच्या वतीने तीव्र निषेध आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तेड निर्माण करण्याचा प्रयत्नकेला जात आहे. हे चुकीचे आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा. निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सिद्धार्थ खरात, विशाल भोसले, गणेश भिसे, जयवंत कांबळे उपस्थित होते.सामाजिक सलोखा राखावा‘लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहनही चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत केले.